Ladki Bahin Yojana Form Approval: घरबसल्या चेक करा तुमचा अर्ज मंजूर झाला की रद्द ?

Ladki Bahin Yojana Form Approval : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ असे सर्च करून हे ॲप डाऊनलोड करा किंवा Narishakti Doot ॲप अगोदरच मोबाईल मध्ये असेल तर ते अपडेट करा. https://play.google.com/store/apps/Narishakti-Doot

नारीशक्ती दूत ॲप मध्ये लॉगीन करा

लॉगिन करण्यासाठी तुमचा नंबर टाका व नंबर वर आलेला ओटीपी टाका.

लॉगिन केल्यानंतर तीन पर्याय दिसतील त्यामधील शेवटचा पर्याय ‘केलेले अर्ज’ वर क्लिक करा.

आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी, आपल्याला हवे ते अर्ज निवडा .

तुम्हाला खालील पैकी अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेट्स दाखवत असेल तर त्याचा अर्थ समजून घेऊ.

  • Pending to submitted – म्हणजेच सर्वेक्षण अर्ज भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.
  • Approved – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
  • In Review – म्हणजेच सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे.
  • Rejected – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
  • Disapproved – Can Edit and Resubmit – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.

वरील स्टेप ऑफलो करून Ladki Bahin Yojana Beneficiary Status पाहू शकता व आपले Ladki Bahin Yojana फ्रॉम मध्ये काही बदल करायचा असेल ते पण करू शकता. Ladki Bahin Yojana चे असेल तर एडिट या option वर क्लीक करा व तुमच्या फ्रॉम ची माहिती तुमच्या समोर दिसेल.

Leave a Comment