Yojana Dhoot Bharti 2024 लाडकी बहीण, युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारची अजून एक भन्नाट योजना, महाराष्ट्र सरकार 50 हजार योजना दूत नियुक्त करणार आहे. घरोघरी जाऊन शासकीय योजनांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ही नियुक्ती करण्यात येणार आहे
Yojana Dhoot Bharti 2024
राज्यात 50 हजार योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दरम्यान, सहा महिन्यांसाठी या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. प्रत्येकाला १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योजना दुत पात्रता व निकष
- वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना योजनेचा लाभ घेता येईल.
- शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
- उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आधिवासी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे आधार कार्ड असावे.
- उमेदवाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे.
मुख्यमंत्री योजना दूत आवश्यक लागणारी कागदपत्रे
- विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज.
- आधार कार्ड.
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इ.
- अधिवासाचा दाखल.(सक्षम यंत्रणेने दिलेला).
- वैयक्तिक बँक खात्याचा तपशील.
- हमीपत्र.(ऑनलाइन अर्जासोबत च्या नमुन्यामधील)
कशी असणार निवड प्रक्रिया? Yojana Dhoot Bharti 2024
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून “मुख्यमंत्री योजनादूत” (Mukhyamantri Yojana Doot) कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे. दरम्यान, यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भात सदरील उमेदवाराची नेमणूक करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया संदर्भात तारीख अद्याप निश्चित झाली नाही. प्रत्येक जिल्हा स्तरावर समन्वय राखण्यासाठी 1 नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.
या भरतीचा अधिकृत GR पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |