Ladki Bahin Yojana Update महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू असणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आता 3 गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानुसार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. लवकरच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करून अंमलबजावणी सुरू करण्याची तयारीही अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली
ही योजना राबविताना गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन मोफत सिलिंडरचे पैसे दिले जाणार असून प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे. त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम लागेल असा दावा अन्न व नागरी पुरवठा विभागातील सूत्रांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सल्लामसलत करून अखेर या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आजमितीस ३ कोटी ४९ लाख कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहे.
त्यातील उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना केंद्राच्या ३०० रुपये अनुदानावरील रक्कम राज्य सरकार देणार असून त्यासाठी वार्षिक ८३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देतांना एका कटुंबात एका शिधापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलिंडर दिले जाईल.
गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच लाभ मिळेल. या अटींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणत: अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी, मोफत गॅस सिलिंडरचा लाभ साधारणत: दीड कोटी कुटुंबांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सरकारवर वार्षिक चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit Naukricorners.com daily to get free job alerts in Marathi for other government jobs.
1 thought on “लाडक्या बहिणींना मिळणार आता 3 गॅस सिलेंडर देखील मोफत नवीन GR”