Ladki Bahin Yojana महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने चालवलेल्या माझी लाडकी बहीण योजनेची बरीच चर्चा झाली होती. या योजनेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निवडणूक विश्लेषकांचे मत आहे.
जुलैमध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले. जुलैपासून तर नोव्हेंबरचा हप्ता महिलांना मिळाला आहे. आता डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेतून मिळणाऱ्या रकमेत विजयी झाल्यानंतर वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या योजनेचा सहावा हप्ता डिसेंबरमध्ये येऊ शकतो, असे मानले जात आहे. यामध्ये पहिले मिळणाऱ्या 1500 ऐवजी आता 2100 रुपये मिळतील अशी माहिती आहे.
बीजेपीचे नेता सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे 1500 वरुन 2100 होतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, 100 टक्के पैसे वाढवून मिळतील. तसंच ही योजना देखील चालू राहील.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तसंच ज्या महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
मुनगंटीवार म्हणालेय की, या योजनेसाठी जे यापूर्वी निकष आहेत. तेच कायम राहतील. यामुळेच या निकषात न बसणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
लाडकी बहिण योजनेसाठी नाव कसे तपासावे?
तुमचे नाव यादीत आहे का, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया करा:
- ऑनलाइन पोर्टलला भेट द्या
सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन योजनेसंबंधी माहिती तपासावी लागेल. तुम्हाला “testmmmlby.mahaitgav.in” या वेबसाइटवर जावे लागेल. - लाभार्थी स्थिती निवडा
वेबसाइटवर जाऊन “लाभार्थी स्थिती” या पर्यायावर क्लिक करा. यापुढे तुम्हाला एक नवीन पेज दिसेल. - नोंदणी क्रमांक टाका
नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि कॅप्चा चेक करा. - ओटीपी पाठवा
‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी प्राप्त होईल. - ओटीपी तपासा
ओटीपी प्राप्त झाल्यावर, तो वेबसाइटवर टाका आणि “चेक” पर्यायावर क्लिक करा.