शेतकरी ओळखपत्र काढलं का? अशी करा नोंदणी, काय होणार फायदा?

farmer id card download maharashtra pdf भारत सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. यासाठी www.mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. नोंदणी आणि ओळखपत्राबाबत जाणून घेऊयात…

🧑🏻‍🌾 शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच, भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव, नकाशे यांचा माहिती संच या बाबीचा समावेश यामध्ये असणार आहे. या संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांना स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करता येईल.

🤳🏻 अशी करा नोंदणी

▪️सर्वप्रथम https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

▪️पहिल्या विंडोत आपल्यासमोर ॲग्रीस्टॅक हे पेज ओपन होईल.

▪️यातील Farmer Registry यावर क्लिक करा. यानंतर थेट नोंदणीचा पर्याय आपल्यासमोर दिसेल.

▪️यात Official आणि Farmer असे दोन पर्याय दिसतील यातील farmer यावर क्लिक करा.

▪️यानंतर खाली Create New user Account यावर क्लिक करा.

▪️पुढील विंडोमध्ये आपला नंबर टाकून सबमिट या बटनावर क्लिक करून नोंदणी करा.

Leave a Comment