Skip to content

पहिली पासून पदवी पर्यंत २५०० ते १ लाखापर्यंत स्कॉलरशिप , असा करा ऑनलाईन अर्ज

Bandhkam Kamgar Yojana : बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. असंघटित क्षेत्रात बांधकाम कामगार सर्वात खालच्या पातळीवर आहेत. अनेकजण बांधकामे करून आपला उदरनिर्वाह करतात. (बॉण्ड कामगार मुलांची शिष्यवृत्ती योजना) अशा कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मंडळाकडून प्राथमिक ते अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना

  • जर बांधकाम कामगारांची मुले शाळेत असतील तर त्यांना इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत दरवर्षी 2,500 रुपये मिळतील.
  • सातव्या वर्गानंतर आठव्या ते दहावीच्या मुलांना वर्षाला 5,000 रुपये मिळणार आहेत.
  • बांधकाम कामगाराला त्याचे मुल दहावी ते बारावीत प्रवेश घेते तेव्हा त्याला १०,००० रुपये दिले जातात, फक्त अट अशी आहे की मुलाने १०वी आणि १२वी मध्ये ५०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
  • बांधकाम कामगाराचे मूल पदवीचे शिक्षण घेत असल्यास, त्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत वर्षाला 20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते.
  • बांधकाम कामगाराचे मूल वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असल्यास प्रतिवर्ष 1,00,000.
  • जर कामगाराचे मूल अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत असेल तर त्याला प्रतिवर्षी 60,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

तसेच बांधकाम कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर तिलाही शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. बांधकाम कामगाराच्या पत्नीलाही बांधकाम कामगाराच्या मुलीप्रमाणे सर्व आर्थिक लाभ मिळतील.

शिष्यवृत्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.

  • ज्या विद्यार्थ्याचा अर्ज सादर करणार आहात त्याच्या शाळेतील उपस्थिती ७५ टक्के असल्याचे उपस्थिती प्रमाण पत्र ज्याला attendance certificate असे म्हणतात. शाळेतील उपस्थिती प्रमाणपत्र नमुना हवा असेल तर लगेच ओरिजिनल नमुना डाउनलोड करा.
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र Bonafied Certificate. तुम्हाला ह्या बोनाफाईड प्रमाणपत्राचा नमुना हवा असेल तर तो देखील उपलब्ध आहे. डाउनलोड करा.
  • मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड.
  • स्वयंघोषणापत्र Self Declaration. स्वयंघोषणापत्राचा नमुना डाउनलोड करा.
  • शिधापत्रिका म्हजेच राशन कार्ड अपलोड करावे. तुमचे राशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करा काही मिनिटात. 

योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. (बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना) ऑनलाइन अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्कॅन केलेल्या स्वरूपात अपलोड करावी लागतील. अर्ज मंजूर झाल्यास पैसे थेट बँक खात्यात जातील.

हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana: तरुणांना प्रत्येकाला महिन्याला १० हजार मिळणार !

2 thoughts on “पहिली पासून पदवी पर्यंत २५०० ते १ लाखापर्यंत स्कॉलरशिप , असा करा ऑनलाईन अर्ज”

  1. Pingback: 48 हजार पगार च्या या सरकारी नोकरीला, लगेच अर्ज करा - naukricorners.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *